नवी दिल्ली - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 'रविवारी सर्वांनी एकत्र येत रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावा, असे अवाहन मोदींनी केले आहे.
आज देशव्यापी लॉकडाऊनला 9 दिवस पूर्ण होत आहेत. देशात जरी लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नसून १३० कोटी लोक एकत्र आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच 5 एप्रिलला सर्वांनी रात्री 9 वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून घरातील दारासमोर, गँलरीमध्ये मेणबत्ती, दिवा, बँटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट सुरु ठेवा.या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, मात्र, यावेळी सर्वांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे आणि घराबाहेर पडू नये, असेही मोदी म्हणाले.