महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींनी टि्वट केला 'टीम मास्क फोर्स'चा व्हिडिओ, म्हणाले... -  बीसीसीआई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. या दरम्यान त्यांनी बीसीसीआय टीम मास्क फोर्सचा व्हिडिओ टि्वट करत त्यामध्ये सहभाग घ्या, असेही म्हटले.

PM NARENDRA MODI SUPPORTED FORCE MASK OF BCCI
PM NARENDRA MODI SUPPORTED FORCE MASK OF BCCI

By

Published : Apr 19, 2020, 9:28 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणून थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. या लढाईसाठी अनेकजण विविध मार्गाने उपाययोजना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. या दरम्यान त्यांनी बीसीसीआयच्या 'टीम मास्क फोर्स'चा व्हिडिओ टि्वट करत त्यामध्ये सहभाग घ्या, असे आवाहनही केले आहे.

आजच्या सर्वात महत्वाच्या कामांपैकी एक असलेल्या टीममॅस्कफोर्सचा तुम्ही भाग व्हा. छोट्या परंतु अत्यावश्यक सावधगिरीमुळे आपण सर्वजण सुरक्षित राहू शकतो. त्यासाठी याबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सरकारने प्रत्येकाला मास्क घालून बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन आणखी बळकट करण्यासाठी बीसीसीआयने एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणजेच ‘मास्क फोर्स’ने लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. टीम इंडिया आता टीम मास्कफोर्स बनली आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत सामील व्हा. सेतुआरोग्य मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा, असे आवाहन बीसीसीआयने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details