टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 'भारत आणि जपानचे संबंध खूप जुने आहेत. जेव्हा भारताच्या जागतिक संबंधांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जपानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे संबंध कित्येक दशकांपासून आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात,' असे मोदी म्हणाले. त्यांचे भाषण संपताच 'वंदे मातरम' आणि 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी करण्यात आली.
‘मी सात महिन्यांपूर्वी जपानमध्ये आलो होतो. आता पुन्हा येथे येणे हे मी माझे भाग्य समजतो. योगायोगाने मागील खेपेस जेव्हा मी येथे आलो होतो, तेव्हा येथे निवडणुकीचे निकाल लागणार होते. तुम्ही सर्वांनी माझे मित्र शिंजो अॅबे यांच्यावर विश्वास दाखवलात. आज मी येथे पुन्हा आलो आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने या प्रधान सेवकावर विश्वास दाखवला आहे,’ असे मोदींनी यावेळी सांगितले.