समस्तीपूर (बिहार) -पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचारासाठी येथे आले. आज प्रचाराचा अंतिम दिवस असून संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे. छपरानंतर पंतप्रधान मोदी समस्तीपूर येथे पोहोचले. तेथे झालेल्या प्रचारसभेतील प्रमुख मुद्दे -
- मंचावर मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित
- केंद्र सरकारच्या मदतीने समस्तीपूरला इंजीनियरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालय मिळाले - मुख्यमंत्री नितीश कुमार
काय म्हणाले मोदी -
- बिहारच्या सर्व राज्यात विजयाचे वातावरण; इथे उसळलेल्या गर्दीमुळे विजयाचा संकल्प पाहत आहे.
- मोठमोठे राजनितिज्ञ म्हणाले, निवडणूक नाही होणार, मात्र, बिहारच्या जनतेने त्यांना खोटे सिद्ध केले
- ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक आधीच म्हणाले आहेत, बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच (एनडीए) जिंकेल
- पहिल्या टप्प्यातील मतदान करणाऱ्या सर्वांना धन्यवाद.
- प्रत्येक सर्वेक्षण एनडीए जिंकण्याचा दावा करत आहेत. त्यामागे ठोस कारण आहे.
- महिलांना आमच्या सरकारने, नितीश सरकारने सर्व प्रकारची संधी दिली
- बिहारमधील तरुणींचेही एनडीएला समर्थन
- आयुष्यभर धुक्यात राहिलेल्या बहिणी ज्यांना उज्ज्वला योजनेच्या मार्फत गॅस मिळाला, त्यादेखील आज आमच्यासोबत आहेत
- दिवाळी आणि छटपुजेपर्यंत ज्यांना मोफत रेशन मिळत आहे, ते कधीतरी भटकत होते. त्यांच्यापर्यंत सरकार आता स्वत: पोहोचत आहे. हे परिवारही आज एनडीएच्या सोबत आहेत.
हेही वाचा -काँग्रेसलाच मत द्या.. भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधियांची जीभ घसरली !