नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. नुकतेच त्यांनी ट्विटरवर भाजपच्या युवा नेत्या प्रियांका शर्मा यांना 'फॉलो' केले आहे. या प्रियांका म्हणजे त्याच, ज्या ममता बॅनर्जींचे मीम शेअर केल्याने चर्चेत आल्या होत्या. पंतप्रधान मोदी फॉलोअर बनल्यानंतर प्रियांका यांनी स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली.
मोदींसारखा फॉलोअर मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. येथे @narendramodi Follows you असे लिहिलेले आहे. प्रियांका यांनी यानंतर केलेल्या ट्विटमध्ये 'हे माझ्यासाठी सर्वांत मोठे सरप्राईज आहे. फॉलो बॅक करण्यासाठी धन्यवाद नरेंद्र मोदीजी. मोठा सन्मान आणि गौरव झाल्यासारखे वाटत आहे,' असे लिहिले आहे.
प्रियांका शर्मा, ट्विटर अकाउंट सोशल मीडियावर सक्रिय राहणारे मोदी सेलिब्रिटीजसह २ हजार १७१ जणांना 'फॉलो' करतात. तर, मोदींना जवळजवळ ४८.१ दशलक्ष लोक 'फॉलो' करतात.याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे 'मीम' शेअर केल्यामुळे प्रियांका चर्चेत आल्या होत्या. १० मे रोजी त्यांना अटकही झाली होती. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मुक्त करण्यात आले होते. प्रियांका याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० (मानहानी) अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. कोलकातामधील स्थानिक तृणमूल नेते विभास हाजरा यांच्या तक्रारीवरून प्रियांका यांच्याविरोधात खिलाफ IT अॅक्टअंतर्गत तक्रारही दाखल करण्यात आली होती.प्रियांका यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर ममता बॅनर्जींचे मीम शेअर केले होते. त्यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या छायाचित्रावर ममता बॅनर्जींचा चेहरा लावला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रियांका यांना सोडण्यात आले. प्रियांका याच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांनाही फटकारले होते. त्यांनी प्रियांका यांना लवकरात लवकर सोडून देण्याचा इशारा दिला होता.असे न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू होईल, असे म्हटले होते. तरीही प्रियांका यांना सोडून देण्यास १८ तास उशीर केल्याचा आरोप करण्यात आला होता.
अटकेतून मुक्तता झाल्यानंतर प्रियांका यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याशी तुरुंगात गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच, 'मला कोणाशीही बोलू देण्यात आले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मनमानी करत आहेत. माझी काहीही चूक नाही. त्यामुळे माफी मागणार नाही. त्याविरोधात लढेन,' असे प्रियांका यांनी म्हटले होते.