महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' भाषणाने आचारसंहितेचा भंग नाही - code of conduct

या भाषणाने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Mar 30, 2019, 3:45 AM IST

नवी दिल्ली - भारताने 'मिशन शक्ती' अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून दिली होती. या भाषणाने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्चला 'मिशन शक्ती' मोहीम फत्ते झाल्यानंतर देशाला उद्देशून भाषण केले होते. या भाषणावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला होता. तर, माकपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

माकपच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची कॉपी मागवली होती. तसेच याबाबत पडताळणी करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली होती. यात कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details