नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील चौकीदारांसोबत ऑडिओ स्वरुपात संवाद साधला. जगभरातील बहुंताश भाषांमध्ये चौकीदार हा शब्द ओळखला जाते. याचा अर्थ हा शब्द सर्व भाषांनी स्वीकारला आहे, असे मोदी म्हणाले.
चोर म्हटल्याने चौकीदाराची बदनामी - पंतप्रधान मोदी - security guards
चौकीदार शब्दावरुन काही लोकांनी चुकीची मोहिम चालवली. त्या लोकांच्या भाषेमुळे तुम्हाला त्रास झाला असेल. याबद्दल मी तुमची माफी मागतो, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी
सध्या देशभरात चौकीदाराचीच चर्चा सुरू आहे. टीव्ही असूद्या किंवा सोशल मीडिया सगळीकडे चौकीदारच दिसत आहेत. आज प्रत्येक भारतीय म्हणत आहे, 'मैं भी चौकीदार', असेही मोदी म्हणाले. चौकीदार शब्दावरुन काही लोकांनी चुकीची मोहिम चालवली. त्या लोकांच्या भाषेमुळे तुम्हाला त्रास झाला असेल. याबद्दल मी तुमची माफी मागतो, असेही मोदी म्हणाले.