नवी दिल्ली - संयुक्त महाराष्ट्राचा आज साठावा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मराठीमध्ये ट्विट करत पंतप्रधानांनी मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !" असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.