पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिरात केले पूजन, शंकराचार्यांच्या ध्यान गुंफेतही जाणार - pilgrimage
केदारनाथ मंदिरात तीर्थ पुरोहित प्रवीण तिवारी आणि बीकेटीसीचे आचार्य ओमकार शुक्ला पंतप्रधानांच्या पूजा-अर्चनेचे पौरोहित्य करतील. यावेळी काही काळासाठी इतर भाविक मंदिरात पूजन करू शकणार नाहीत.
डेहराडून/रुद्रप्रयाग - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) सकाळी केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली. मोदी निवडणुकीतील विजयासाठी मंदिरात प्रार्थना केली, अशी चर्चा आहे. यानंतर ते पुनर्निर्माण कार्यक्रमाची माहिती घेतील. तसेच, ध्यान गुंफेतही जातील.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. जवळपास ३ किलोमीटरच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आल्यामुळे केदारपुरीला छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांसह एसपीजी, पीएससी, होमगार्ड जवान हेही तैनात आहेत. शासन, प्रशासन आणि पोलीस अधिकारी येथे २ दिवसांपासून बंदोबस्त ठेवून आहेत. पंतप्रधानांचे हेलीकॉप्टर व्हीआयपी हेलीपॅडवर लँड होईल. मंदिर परिसरात जाणाऱया रस्त्यांवरील बर्फ साफ करण्यात आले असून येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
जिलाधिकारी मंगेश घिल्डियाल आणि पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. विशेष संरक्षण दलाचे ३० सदस्यीय पथक ४ दिवसांपासून केदारनाथ येथे तळ ठोकून आहे. या परिसरात एकूण ८०० जवानांना तैनात करण्यात आले आहे.
केदारनाथ मंदिरात तीर्थ पुरोहित प्रवीण तिवारी आणि बीकेटीसीचे आचार्य ओमकार शुक्ला पंतप्रधानांच्या पूजा-अर्चनेचे पौरोहित्य करतील. यावेळी काही काळासाठी इतर भाविक मंदिरात पूजन करू शकणार नाहीत.
सकाळी ८ वाजेपर्यंतच सकाळचे दर्शन सुरू राहील. येथे १०० मीटरच्या परिसरात बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. केदारसनाथमध्ये उपस्थित असलेल्या भाविकांना १०० मीटर दूर थांबवले जाईल. तर, चालत केदारनाथला जाणाऱ्यांना बेस कॅम्पवरच थांबविले जाईल. मोदी जितका वेळ मंदिरात असतील, तितक्या वेळासाठी इतर भाविक मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकणार नाहीत, असे जिल्हाधिकारी घिल्डियाल यांनी सांगितले. गर्दी-गोंधळ होऊ नये, यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.