रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'किसान मानधन योजने'चा रांचीत शुभारंभ केला. तसेच झारखंड विधानसभेच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते रांचीत 'किसान मानधन योजने'चा शुभारंभ - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'किसान मानधन योजने'चा रांचीत शुभारंभ केला. तसेच झारखंड विधानसभेच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
किसान मान धन योजना मासिक पेंशनच्या स्वरुपात राबवली जात आहे. या योजनेच १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. शेतकऱ्याने वयाची ६० वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला महिना ३ हजार रुपये पेंशन मिळणार आहे. या योजनेसाठी झारखंडमध्ये १ लाख ९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.