महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'एक देश, एक निवडणूक'ला बहुतांश पक्षांचा पाठिंबा, सल्ला देण्यासाठी समिती स्थापन होणार

लोकसभा किंवा राज्यसभेत किमान एक खासदार असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना मोदींनी एकत्रित निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीला बोलावले होते. एकूण ४० पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. यातील २१ पक्षांचे अध्यक्ष बैठकीला हजर राहिले. तर, तिघांनी आपले विचार लिखित स्वरूपात पाठवले.

राजनाथ सिंह

By

Published : Jun 19, 2019, 10:24 PM IST

नवी दिल्ली - 'एक देश, एक निवडणूक' या संकल्पनेला बहुतांश पक्षाच्या प्रमुखांनी पाठिंबा दिला आहे. सीपीआयचे वेगळे मत आहे. मात्र, त्यांनी विरोध केलेला नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ही सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान मोदींनी बोलावली होती. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यासंदर्भात सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. लोकसभा किंवा राज्यसभेत किमान एक खासदार असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना मोदींनी एकत्रित निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीला बोलावले होते. एकूण ४० पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. यातील २१ पक्षांचे अध्यक्ष बैठकीला हजर राहिले. तर, तिघांनी आपले विचार लिखित स्वरूपात पाठवले. संपुआतील काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

संसदेच्या ग्रंथालय इमारतीत ही बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला या बैठकीला उपस्थित होते.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, डीएमकेचे एमके स्टॅलिन, टीडीपीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. ईव्हीएम मशीनबद्दल बैठक असती, तर मी सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिले असते, असे टि्वट मायावती यांनी केले होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details