महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदीजी, हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना सांगा, मसूद अजहरला कोणी मोकळे सोडले - राहुल गांधी

जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, राहुल गांधी यांनी या संघटनेचा म्होरक्या मसूद याच्या सुटकेवरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

जैश-ए-मोहम्मद

By

Published : Mar 11, 2019, 3:42 PM IST

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांना प्राण गमवावे लागले. या जवानांच्या कुटुंबीयांना सांगा, या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरची भारताच्या कैदेतून सुटका करणारे कोण होते. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच याचे 'डील मेकर' आहेत, असा आरोप त्यांनी केला.

जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, राहुल गांधी यांनी या संघटनेचा म्होरक्या मसूद याच्या सुटकेवरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. मसूद अजहरची १९९९ मध्ये भारताच्या कैदेतून सुटका कोणी केली होती, हे मोदींनी पुलवामातील त्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना सांगावे, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी १९९९ मध्ये मसूदच्या सुटकेवेळचे अजित डोवाल यांचे काही फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये डोवाल यांनीच ही वाटाघाटी केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. पुलवामातील जवानांवर हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरची भारताच्या कैदेतून सुटका करणारे कोण होते. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच याचे ‘डील मेकर’ आहेत. हे मोदींनी जवानांच्या कुटुंबीयांना सांगावे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

'देशातील सर्वांत जुना पक्ष असलेली काँग्रेस कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही,' असे कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यानही राहुल म्हणाले होते. यावेळी त्यांनी १९९९मध्ये मसूद अजहरच्या सुटकेवरुन भाजपावर निशाणा साधला होता.

१९९९ मध्ये मसूद अजहरसह काही दहशतवाद्यांची भारताने सुटका केली होती. त्यावेळी वाजपेयींचे सरकार होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी इंडिअन एअरलाइन्सचे विमान १५० प्रवाशांसह हायजॅक करुन अफगाणिस्तानातील कंदाहर येथे नेले होते. या प्रवाशांना ओलीस ठेवून मसूद अझहरच्या सुटकेची मागणी सरकारकडे करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details