नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे सतत विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. पंतप्रधान मोदींचा अटल बोगद्याच्या लोकार्पण कार्यक्रमामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदी बोगद्यात कुणीही नसताना हात उंचावून अभिवादन करताना दिसत आहेत. यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. याचबरोबर नेटकऱ्यांनीही मोदींचा हात दाखवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना ट्रोल केले.
'मोदीजी मौन तोडा आणि देशातील समस्यांवर थोडं बोला' - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अटल बोगद्याच्या लोकार्पण कार्यक्रमामधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदी बोगद्यात कुणीही नसताना हात उंचावून अभिवादन करताना दिसत आहेत. यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
'पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात दाखवत अभिवादन करणं सोडा, आपलं मौन तोडा आणि देशातील प्रश्नांना सामोरे जा, देश तुम्हाला खूप काही प्रश्न विचारत आहे', असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणणे, हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.
यापूर्वीही राहुल गांधींनी मोदींवर चीन वादावरून निशाणा साधला होता. भारताचे पंतप्रधान केवळ आपल्या प्रतिमेबाबत विचार करतात, हे चीनला माहीत असल्यामुळेच चीन भारतावर हल्ला करण्याचे धाडस दाखवत आहे. चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे. मात्र, मोदी ते नाकारत आहेत. आम्ही सत्तेत असतो तर चीनला 15 मिनिटांत भारताच्या भूमीवरून पिटाळून लावले असते, असे राहुल गांधी म्हणाले.