नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या दशकातील हे पहिले अधिवेशन आहे. भारताच्या भविष्यासाठी हे अधिवेशन अतिशय महत्वाचे असल्याचे मत पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांनी यांनी यावेळी व्यक्त केले. संसदभवनात या अधिवेशनावेळी भारताच्या भविष्य समोर ठेऊन चर्चा झाली पाहिजे, असेही मत व्यक्त केले.
जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू - मोदी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मला विश्वास आहे की, ज्या आशा आणि अपेक्षेने नागरिकांनी आम्हाला संसदेत पाठवले आहे. आम्ही या संसदेच्या पवित्र स्थानाचा पुरेपूर उपयोग करत आणि लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे पालन करत जनतेच्या आशा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आमचे योगदान देऊ, आम्ही त्यामध्ये मागे हटणार नाही.
भारताच्या भविष्यासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान मोदी देशाच्या स्वातंत्र्यासठी त्या देशभक्तांनी जी स्वप्ने पाहिली होती, त्याची पूर्तता करण्याची सुवर्ण संधी आम्हाला लाभलेली आहे. भारताच्या इतिहासात 2020 मध्ये पहिल्यांदाच आम्हाला टप्प्या-टप्प्याने चार-पाच वेळा निधी वितरीत करावा लागला. मला विश्वास आहे की, या अधिवेशनाकडे त्याच अनुषंगाने पाहिले जाईल, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्य़क्त केला.