नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आभारदर्शक भाषण करत आहेत. १५वी लोकसभेतील हे त्यांचे शेवटचे भाषण आहे. दरम्यान ते आपल्या कारकीर्दीतील विविध योजनांची माहिती सभागृहात देत आहेत.
राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावाला पंतप्रधान मोदींचे उत्तर - संसद
लोकसभेतील भाषणाची सुरुवात मोदींनी विरोधकांना आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्या. 'हेल्दी कॉम्पिटिशन' असावे असे मोदी म्हणाले.
लोकसभेतील भाषणाची सुरुवात मोदींनी विरोधकांना आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्या. 'हेल्दी कॉम्पिटिशन' असावे असे मोदी म्हणाले. तसेच २०१९ मध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व नवमतदारांचे मोदींनी अभिनंदन केले. पारदर्शकता ही आमच्या सरकारची ओळख आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई हेच आमच्या सरकारचे काम असल्याचेही मोदी म्हणाले.
जनतेसमोर आम्हाला गेल्या ५ वर्षांचा हिशेब द्यायचा आहे. विनाश काळातून भारत सावरत आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या साडेचार वर्षात सध्या देशाची अर्थव्यवस्था ६ व्या क्रमांकावर आहे. काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. मग आता अर्थव्यवस्था प्रगती करत असतानाही काँग्रेसला त्रास का होतो, असा प्रश्नही मोदींनी यावेळी उपस्थित केला. मोबाईल, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्च्यूररमध्ये भारत प्रगती करत आहे. स्टार्टअपमुळे विकासाला चालना मिळाली आहे, असेही ते म्हणाले.