वाराणसी -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी आपल्या वाराणसी मतदारसंघात जनतेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी 'वो जो सामने मुश्किलों का अंबार है, उसी से तो मेरे हौसलों की मीनार है' ही कविता ऐकवली.
दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा दुसरा वाराणसी दौरा आहे. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यावर भाष्य केले. तर सोबतच नरेंद्र मोदींनी भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचेही वाराणसीत उद्घाटन केले.
मोदींनी ऐकवलेली कविता -
'वो जो सामने मुश्किलों का अंबार है, उसी से तो मेरे हौसलों की मीनार है।
चुनौतियों को देखकर घबराना कैसा, इन्हीं में तो छिपी संभावना अपार है।।