महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले 'प्रधानमंत्री किसान' योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनावरण.. - नरेंद्र मोदी कर्नाटक दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. बंगळुरू विमानतळावर मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा आणि भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनावरण केले. तसेच, कृषी कर्म पुरस्काराचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

PM modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jan 2, 2020, 2:44 PM IST

Updated : Jan 2, 2020, 4:55 PM IST

बंगळुरू- आज प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत आठ कोटीव्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. तसेच, याआधी सहा कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्यात आली होती. आजपर्यंत १२ हजार कोटी रूपये शेकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही माहिती दिली. ते कर्नाटकच्या तुमकुरमध्ये बोलत होते.

तुमकुरमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री किसान योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनावरण करण्यात आले. तसेच कृषी कर्म पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की एकेकाळी देशात गरीब आणि शेतकऱ्यांसाठी जर दिल्लीतून एक रूपया पाठवला, तर त्यातील १५ पैसेच त्यांच्यापर्यंत पोहोचायचे. मात्र, आज त्यांच्यासाठी असलेली पूर्ण रक्कम ही थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकार करत असलेल्या कामांमुळे, भारतातील मसाल्यांचे उत्पादन हे २५ लाख टनांपेक्षा अधिक प्रमाणात वाढले आहे. तसेच मसाल्यांची निर्यातही साधारणपणे १५ ते १९ हजार कोटी रूपयांनी वाढली आहे. हे सरकार असा प्रयत्न करत आहे, की २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक शेतकरी, आतापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवू शकेल, असेही ते म्हणाले.

त्याआधी सकाळी, पंतप्रधान मोदींनी सिद्धगंगा मठाला भेट दिली. याठिकाणी भाषण करताना पंतप्रधानांनी 'सीएए'च्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली. जर तुम्हाला घोषणाबाजीच करायची आहे, तर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत घोषणाबाजी करा. जर तुम्हाला मोर्चा काढायचा असेल, तर पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू-दलित अशा पीडित आणि शोषितांसाठी मोर्चे काढा. अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

हेही वाचा -केरळ : विधानसभेतील 'सीएए' विरोधी ठरावाला कायदेशीर आधार नाही, राज्यपालांनी फटकारलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. बंगळुरू विमानतळावर मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा आणि भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

या दौऱ्यामध्ये तुमकुर येथे मोदी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत बक्षिस वितरण करणार आहेत. तसेच एका संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. शेतकऱ्यांच्या संबधीत योजनांची घोषणाही यावेळी ते करण्यात येणार आहेत.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेलाही मोदी भेट देणार आहेत. तेथे प्रयोगशाळांचे उद्घाटन मोदींच्या करण्यात येणार आहे.

हेही वाचा -वाहतूक पोलिसांनी दंड केल्याच्या रागातून युवकानं पेटवली स्वत:ची नवीकोरी दुचाकी

Last Updated : Jan 2, 2020, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details