महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाड यांचे कर्तृत्व पुढील अनेक वर्ष लोकप्रिय होत राहील, मोदींनी व्यक्त केला शोक

कर्नाड यांच्या निधनाने मी दु:खी झालो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रर्थना मोदींनी केली.

By

Published : Jun 10, 2019, 2:23 PM IST

Updated : Jun 10, 2019, 3:03 PM IST

मोदींनी व्यक्त केला शोक

बंगळुरू- प्रसिद्ध अभिनेते, जेष्ठ सहित्यिक आणि नाटककार गिरिश कर्नाड यांचे प्रदिर्घ आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. ट्विटरवरून त्यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली.
साहित्यिक गिरिश कर्नाड यांना श्रद्धांजली वाहताना मोदी म्हणाले, की गिरिश कर्नाड यांनी त्यांच्या बहुमुखी अभिनयासाठी आठवले जाईल. कर्नाड यांचे कर्तृत्व पुढील अनेक वर्ष लोकप्रिय होत राहील. त्यांच्या निधनाने मी दु:खी झालो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रर्थना त्यांनी केली.

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ साली माथेरान येथे झाला होता. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. पुढे त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतासह विदेशातही बरेच नाव कमावले आहे. कर्नाड यांनी लिहिलेले 'युवती' (१९६१) हे पहिले नाटक होते. त्यांनतर त्यांचे 'तुघलक' (१९६४) हे नाटक देखील गाजले होते. त्यांनी बऱ्याच नाटकांचे लिखाणही केले आहे. त्यांनी १९७० मध्ये कन्नड चित्रपट 'संस्कार' मधून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'वंशवृक्ष' चित्रपटाद्वारे सुरुवात केली. या चित्रपटाला बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

Last Updated : Jun 10, 2019, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details