महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी १८० डिग्रीचे पंतप्रधान, जे बोलतात त्याच्या उलटे काम करतात - अखिलेश

नरेंद्र मोदी हे १८० डिग्रीचे पंतप्रधान आहेत, ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे काम करतात. ते केवळ १ टक्के लोकांनी निवडलेले पंतप्रधान आहेत, असे अखिलेश यादव म्हणाले.

नवी दिल्ली

By

Published : May 5, 2019, 12:22 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मागील टप्प्यांमध्ये भाजप मागे पडत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा आता बदलली आहे. पंतप्रधान मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे विषयच नाहीत. विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर समस्यांविषयी ते बोलायला तयार नाहीत, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी हे १८० डिग्रीचे पंतप्रधान आहेत, ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे काम करतात. ते केवळ १ टक्के लोकांनी निवडलेले पंतप्रधान आहेत. भाजपचे गणित आता बिघडले आहे. त्यांना माहीत आहे की, ते सरकार बनवण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे ते सीबीआय, आयटी (प्राप्तिकर विभाग), ईडी (सक्तवसुली संचलनालय) यांचा वापर करत आहेत. निवडणुका चालू असतानाही या संस्थांचा वापर करून लोकांना घाबरवणारे हे पहिलेच सरकार असल्याचे ते म्हणाले.

केंद्रात कोणाची सत्ता येणार, पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय समाजवादी पक्ष, बसप, आरएलडी हे पक्ष घेतील असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details