नवी दिल्ली :भारत- चीन सीमावाद, देशातील कोरोनाचा प्रसार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्त्वाच्या मुदद्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांच्यात बैठक...विविध प्रश्नांवर चर्चा - PM Modi
भारत- चीन सीमावादानंतर पंतप्रधान मोदींनी नुकतीच लडाखला भेट देवून सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लष्कराचे मनोबल वाढविले. त्यानंतर आज मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती दिली, असे ट्विट राष्ट्रपती कार्यालयाने केले आहे.
भारत- चीन सीमावादानंतर पंतप्रधान मोदींनी नुकतीच लडाखला भेट देवून सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लष्कराचे मनोबल वाढविले. त्यानंतर आज मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली. देशात कोरोना प्रसारही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासह जगभरातील कोरोनाची स्थीत, आशिया खंडातील बदलती स्थिती, चीनचे आक्रमक धोरण यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी.