महाराष्ट्र

maharashtra

31 मे नंतर लॉकडाऊनबाबत काय असणार रणनीती ? मोदी-शाह यांची महत्त्वपूर्ण बैठक पडली पार..

By

Published : May 29, 2020, 2:38 PM IST

Updated : May 30, 2020, 12:07 AM IST

लॉकडाऊनचा चौथा टप्पाही 31 मे ला संपणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली आहे. बैठकीत कोरोना महामारी आणि लॉकडाऊनवर आढावा आला.

नरेंद्र मोदी अन् अमित शाह
नरेंद्र मोदी अन् अमित शाह

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तसेच लॉकडाऊनचा चौथा टप्पाही 31 मे ला संपणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली. बैठकीत कोरोना महामारी आणि लॉकडाऊनवर आढावा घेतला गेला.

गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. अनेक राज्यांनी लॉकडाउन सुरू ठेवण्यास सांगितले. तसेच ज्या भागात कोरोचा प्रसार नाही. तेथील कामकाज थोड्या प्रमाणात सुरु करण्याचेही मत मांडले. आजच्या बैठकीत 31 मे नंतरची योजना आखण्यात येत आहे. दरम्यान 31 मे ला पंतप्रधान रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे मन की बातमधून पंतप्रधान पुढील धोरणाची माहिती देण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोरोनामुळे संकटात सापडलेल्यांना दिलासा देणे व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. याशिवाय केंद्र सरकारने आठ क्षेत्रामध्ये खासगीकरण करण्याची घोषणाही केली आहे. आर्थिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचे सरकारसमोर खरे आव्हान आहे.

Last Updated : May 30, 2020, 12:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details