महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे, शिवराज सिंह चौहान बरळले - मोदी देव शिवराज सिंह चौहान

भारतात राहणारे ते स्थलांतरीत, ज्यांच्यासाठी पाकिस्तानमधील जीवन हे अस्थिर आणि असुरक्षित होते. जे म्हणत की आम्ही इथेच मरू मात्र पाकिस्तानमध्ये परत जाणार नाही, त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणे अवतरले आहेत. त्या लोकांना मोदींनी नवजीवन दिले आहे, असे शिवराज सिंह चौहान नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत बोलताना म्हणाले.

शिवराज सिंह चौहान नरेंद्र मोदी देव
#CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे!

By

Published : Dec 24, 2019, 9:02 AM IST

जयपूर - पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर ज्यांचा छळ होत आला आहे, अशा स्थलांतरीत लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणेच आहेत, असे वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले शिवराज सिंह चौहान हे सोमवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

#CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे!

भारतात राहणारे ते स्थलांतरीत, ज्यांच्यासाठी पाकिस्तानमधील जीवन हे अस्थिर आणि असुरक्षित होते. जे म्हणत की आम्ही इथेच मरू मात्र पाकिस्तानमध्ये परत जाणार नाही, त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणे अवतरले आहेत. त्या लोकांना मोदींनी नवजीवन दिले आहे, असेही ते नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत बोलताना म्हणाले.

काँग्रेस हे सीएए मुद्यावरून जनतेची दिशाभूल करत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीव्हीवरून व्हिडिओ संदेश देण्याऐवजी, संसदेमध्ये कॅब पारित होण्याआधीच्या चर्चेमध्ये याबाबत बोलायला हवे होते, अशी टीकाही शिवराज यांनी काँग्रेसवर केली. भारतातील स्थलांतरीत लोकांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न तरी तुम्ही कधी केला आहे का? असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

हेही वाचा :लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details