महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 25, 2020, 7:44 PM IST

ETV Bharat / bharat

महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले, कोरोनाविरुद्धचे युद्ध आपणास २१ दिवसात जिंकायचंय - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणशी मतदारसंघातील लोकांशी संवाद साधला. कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण व भारत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. आपल्या संवादात त्यांनी कोरोनाविरुद्धच्या युद्धाची तुलना महाभारतातील युद्धाशी केली. मोदी म्हणाले की..

pm-modi-interaction-with-citizens-of-varanasi-after-the-announcement-of-a-countrywide-lockdown
पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - पीएम मोदींनी म्हटले की, पांडवांनी महाभारताचे युद्ध 18 दिवसांनंतर जिंकले होते. आज कोरोनाविरुद्धच्या युद्धात संपूर्ण देश उतरला आहे. येणाऱ्या २१ दिवसांत आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे. मोदी म्हणाले, की संकटाच्या या प्रसंगी रुग्णालयातील सफेद कपड्यात दिसणारे लोक देवाचे अवतार आहेत. त्यांचा सम्मान करा. या २१ दिवसात नऊ गरीब कुटूंबांची मदत करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणशीतील जनतेशी संवाद साधला कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बातचीत केली. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाबाबत अफवा न पसरवणे, आपल्या मर्जीने कोणतेही औषध न घेणे त्याचबरोबर आरोग्य सेवेत आपले योगदान देणाऱ्या डॉक्टर-परिचारिकांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

मोदी म्हणाले, की महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी, सारथी होते. आज 130 कोटी महारथींच्या बळावर आपल्याला कोरोनाविरुद्धची ही लडाई जिंकायची आहे.

महाभारताच्या युद्धात 18 दिवसानंतर पांडवांचा विजय झाला होता. आज कोरोना विरुद्धचे युद्ध संपूर्ण देश लढत आहे. २१ दिवसात या युद्धात विजय मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details