नवी दिल्ली - भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनादिवशीच योगायोगाने बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सणही आहे. लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदींना अनेक लहान मुलींनी आणि महिलांनी राख्या बांधल्या. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा उत्सव त्यांनी पंतप्रधान मोदींबरोबर साजरा केला.
पंतप्रधान बनले चिमुरड्यांचे भाऊराया, रक्षाबंधन सण उत्साहात साजरा - रक्षाबंधन सण
पंतप्रधान मोदींना अनेक लहान मुलींनी आणि महिलांनी राख्या बांधल्या.

रक्षाबंधन
आज (गुरुवारी) सकाळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांबरोबर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. महिला आणि मुलींनी त्यांना हातभरुन राख्या बांधल्या. यावेळी मोदींनी लहानग्यांबरोबर आणि महिलांशी संवाद साधला. चिमुरड्यांनी पंतप्रधानांना आणलेल्या भेटवस्तूही दिल्या.