महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना युद्ध: 'पंतप्रधान केअर फंड' स्थापन, मदत करण्याचे मोदींचे आवाहन - pm modi care fund established

मोदींच्या आवाहान नंतर अक्षय कुमारने 25 कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडात रक्कम जमा केली आहे. कोव्हिड 19 च्या विरोधात लढाई लढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले आहे.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

By

Published : Mar 28, 2020, 9:23 PM IST

Updated : Mar 28, 2020, 9:52 PM IST

नवी दिल्ली - भारतासमोर कोरोना विषाणचे संकट उभे राहीले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी 'पंतप्रधान केअर फंड' ची निर्मिती करण्यात आली आहे. या फंडात मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या फंडातील रकमेतून भविष्यात इतरही समस्यांवर मात करता येणार आहे. त्यातून चांगल्या भारताची निर्मिती होईल, असे मोदी यावेळी म्हणाले.

मोदींच्या आवाहनानंतर अक्षय कुमारने 25 कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडात जमा केली आहेत. कोव्हिड 19 च्या विरोधात लढाई लढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले आहे.

पीएम केअर फंडात लहान रकमेची मदतही स्वीकारण्यात येणार आहे. या फंडामुळे आपत्तीशी लढण्यासाठी आपण आणखी मजबूत होऊ. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी संशोधनालाही प्रोत्साहन देण्यात येईल. आपल्या भावी पिढ्या समुद्ध करण्यासाठी कोणतीही कसर सोडायला नको, असे मोदी म्हणाले.

कोरोनाच्या सामन्यासाठी भारताने दोन लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. देशभरातील खासगी उद्योगांनीही कोरोनाच्या मदतीसाठी हात पुढे केले आहे.

Last Updated : Mar 28, 2020, 9:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details