महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दीदी, तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद ठरेल, मोदींचे ममतांना उत्तर

'मला सांगण्यात आले आहे, इथे दीदींनी म्हटले आहे की, त्या मोदींना थप्पड मारू इच्छितात. अहो ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद बनेल. त्यामुळे मी तुमची थप्पडही खाईन,' असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : May 9, 2019, 2:57 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना खरमरीत उत्तर दिले आहे. 'दीदींची मोदींना थप्पड मारायची इच्छा आहे. मी थप्पड खायला तयार आहे. आता दीदींची थप्पडच माझ्यासाठी आशीर्वाद बनेल,' असे मोदींनी म्हटले आहे. ते पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे एका सभेत बोलत होते.

'मला सांगण्यात आले आहे, इथे दीदींनी म्हटले आहे की, त्या मोदींना थप्पड मारू इच्छितात. अहो ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद बनेल. त्यामुळे मी तुमची थप्पडही खाईन,' असे मोदी म्हणाले. या सभेमध्ये मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला. २३ मेनंतर ममता दीदींच्या सत्तेचे पतन होण्यास सुरुवात होईल, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details