नवी दिल्ली -पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढविण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. सद्यस्थितीत अनेक विकसित देशांपेक्षा भारताची स्थिती चांगली आहे, कारण आपण सर्वात आधी लॉकडाऊन सुरू केला, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
'लॉकडाऊन वाढविण्याचा पंतप्रधानांचा निर्णय योग्यच'
जर लॉकडाऊन थांबवला तर सर्वकाही हातातून सुटेल. त्यामुळे संचारबंदी वाढविणे हा योग्य निर्णय आहे, असे केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल
जर लॉकडाऊन थांबवला तर सर्वकाही हातातून सुटेल. त्यामुळे संचारबंदी वाढविणे हा योग्य निर्णय आहे, असे केजरीवाल म्हणाले. आज पंतप्रधान मोदींनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी सर्व राज्यांनी केली आहे. त्यानुसार लॉकडाऊन वाढविण्यात येईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्याआधीची केजरीवाल यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.