सिरमौर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्लास्टिकमुक्त देश करण्यासाठी सर्व ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. विविध मोहिमांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीचे संदेश दिले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सिरमौर जिल्ह्यातील लाणा भालता पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या बारु साहिब गावामध्ये प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला आहे. बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टने आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करुन त्यापासून विटा आणि फरशी बनवल्या आहेत.
बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टने आसपासच्या पंचायतीमधील कचरा गोळा करण्यास गाड्या ठेवल्या आहेत. कचरा आणि प्लास्टिक एक ठिकाणी गोळा केले जाते. त्यावर प्रकिया करुन त्यापासून विटा आणि फरशी तयार केली जाते. बांधकामासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.