महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील 'या' रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी

प्लाझ्मा थेरपी कोरोनाबाधितांवर उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आता सरकारने देशभरातील २१ रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी दिली आहे.

देशभरातील 'या' रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी
देशभरातील 'या' रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी

By

Published : May 8, 2020, 11:10 PM IST

नवी दिल्ली -जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात दररोज वाढणाऱ्या कोरानाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोना विषाणुवर लस शोधण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर प्लाझ्मा थेरपी कोरोनाबाधितांवर उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आता सरकारने देशभरातील २१ रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपीची परवानगी दिली आहे.

ही आहेत देशभरातील २१ रुग्णालये -

  1. श्रीमती. एनएचएल म्युन्सिपल मेडिकल कॉलेज, अहमदाबाद, गुजरात
  2. बी.जे. मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद, गुजरात
  3. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भावनगर, गुजरात
  4. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुरत, गुजरात
  5. सवाई मानसिंग मेडिकल कॉलेज, जयपूर, राजस्थान
  6. महात्मा गांधी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, जयपूर, राजस्थान
  7. पंजाब सतगुर प्रताप सिंह हॉस्पिटल, लुधियाना, पंजाब
  8. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, महाराष्ट्र
  9. पुणे रुग्णालय व संशोधन केंद्र, पुणे, महाराष्ट्र
  10. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई, महाराष्ट्र
  11. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर
  12. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, महाराष्ट्र
  13. मदुराई मेडिकल कॉलेज, मदुराई, तामिळनाडू
  14. मद्रास मेडिकल कॉलेज, चेन्नई, तामिळनाडू
  15. गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ, मध्य प्रदेश
  16. महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज, इंदूर, मध्य प्रदेश
  17. शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नोएडा,
  18. संजय गांधी पदव्युत्तर शिक्षण संस्था, लखनऊ, उत्तर प्रदेश
  19. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हुबळी, कर्नाटक
  20. गांधी वैद्यकीय महाविद्यालय, तेलंगणा
  21. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था,चंदीगड

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

कोरोनाची लागण झालेला रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या दोन चाचण्या घेतल्या जातात. त्याच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चौदा दिवसांनी पुन्हा एकदा त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. यावेळी त्याच्या रक्तामध्ये अँटीबॉडीजचे घटक (घातक विषाणूंना नष्ट करणारा रक्तातील घटक) शिल्लक आहेत का हे तपासले जाते.

जर या व्यक्तीच्या रक्तांमधील अँटीबॉडी या एका ठराविक पातळीहून अधिक असतील आणि या व्यक्तीचे वजन ५५ किलोंहून अधिक असेल, तर त्याच्या रक्तामधील ८०० मिलीलीटर प्लाझ्मा काढला जातो. हा प्लाझ्मानंतर चार भागांमध्ये विभागला जातो. यामधील २०० मिलीलीटर प्लाझ्मा हा गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. हा प्लाझ्मा कित्येक आठवड्यांपर्यंत साठवून ठेवता येतो.

ABOUT THE AUTHOR

...view details