अहमदाबाद - अहमदाबादहून जयपूरला जाणाऱ्या गो एअरच्या G८- ७०२ या विमानात कबूतर शिरले होते. विमानाने उड्डान घेण्याआधी काही मिनीट आधी ही घटना लक्षात आली. मात्र, यामुळे प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला. कबूतर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विमानाचे उड्डाणही उशिराने झाले.
VIDEO: अहमदाबाद- जयपूर विमानात शिरलं कबूतर; प्रवाशांची उडाली धांदल - pigeon boards aircraft
विमानात कबूतर उडताना पाहिल्याने प्रवाशांना थोडा वेळ काय चालू आहे ते समजेना. कबूतर इकडून तिकडून उडत असल्याने ते कोणाच्याही हाती लागेना.
विमानात कबूतर उडताना पाहिल्याने प्रवाशांना थोडा वेळ काय चालू आहे ते समजेना. कबूतर इकडून तिकडून उडत असल्याने ते कोणाच्याही हाती लागेना. कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न केला मात्र, कबूतर हाती येत नव्हते. शेवटी कबूतराला विमानाबाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. तोपर्यंत अनेक प्रवाशांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. यामुळे जयपूरला जाणाऱ्या विमानाला अर्धा तास उशीर झाला.
कबूतर आधीच विमानात शिरले होते. एक प्रवासी शेल्फमध्ये बॅग ठेवण्यासाठी गेला असता त्याला शेल्फमध्ये कबूतर दिसले. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. जर विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ही घटना समोर आली असती तर कबूतरानेही प्रवाशांसोबत जयपूर अहमदाबाद प्रवास 'विना तिकिट' केला असता.