नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचाराशी संबध असल्यावरून पोलिसांनी 'पॉप्यूलर फ्रँट ऑफ इंडिया' या संघटनेचा सचिव इलियास याला अटक केली आहे. तर संघटनेचा अध्यक्ष परवेजला ताब्यात घेतले आहे. शाहीन बागेतील आंदोलकांना आर्थिक मदत केल्याचा आरोप या संघटनेवर आहे.
दिल्ली हिंसाचार: 'पॉप्यूलर फ्रँट ऑफ इंडिया' संघटनेचा अध्यक्ष ताब्यात, तर सचिवाला अटक - दिल्ली हिंसाचार
संघटनेचा अध्यक्ष परवेज यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीआयएफ या संघटेनेचे ४० सदस्य पोलिसांच्या रडारवर आहेत.
दिल्ली हिंसाचार
इलियास हा शिव विहार येथील रहिवासी असून दिल्ली हिंसाचारासंबधी त्याची चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. संघटनेचा अध्यक्ष परवेज यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीआयएफ या संघटेनेचे ४० सदस्य पोलिसांच्या रडारवर आहेत. दिल्ली हिंसाचारात 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल आहे. तर शाहीन बाग परिसरात अनेक दिवसांपासून सीएए विरोधी आंदोलन सुरु आहे.