महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बेजबाबदारपणा! 'मरकज'साठी 15 देशांतील लोक उपस्थित, अनेकजण होते कोरोनाबाधित - दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील मरकज

आता दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील मरकजमधील अतिशय आर्श्चयकारक छायाचित्रे समोर आली आहेत. देशभरात लॉकडाऊन असतानाही मरकजमध्ये एकाच ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते. यातील अधिक लोक हे १५ वेगवेगळ्या देशातून आलेले होते.

पंधरा देशांतून आले होते मरकजमधील लोक
पंधरा देशांतून आले होते मरकजमधील लोक

By

Published : Apr 2, 2020, 12:19 PM IST

नवी दिल्ली - सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही अनेक उपाययोजना करत आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. अशात आता दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील मरकजमधील अतिशय आर्श्चयकारक छायाचित्रे समोर आली आहेत. देशभरात लॉकडाऊन असतानाही मरकजमध्ये एकाच ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते. यातील अधिक लोक हे १५ वेगवेगळ्या देशातून आलेले होते.

याबद्दल प्रशासनाला काहीही महिती देण्यात आली नव्हती. तर, नुकतच समोर आलेल्या माहितीनुसार यातील बहुतेक लोक हे कोरोना संशयित आहेत. २३ मार्चला याच मरकजमधील लोक देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये गेले. ज्यानंतर आता संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

दिल्लीत रोज कोरोनाचे अनेक नवे रग्ण समोर येत आहेत. अशात आता मरकजमधील फोटोदेखील समोर येत आहेत. या प्रकरणी मौलानासह ७ लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून मौलाना साद सध्या फरार आहे. दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details