महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तींची नजरकैदेतून सुटका - pdp chief mehbooba muftil latest news

फ्ती यांना मागील वर्षी पाच ऑगस्टपासून त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करण्यात आले होते. यानंतर शेकडो लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या विविध नेत्यांचाही समावेश होता.

Mehbooba Mufti is being released from detention
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तींची नजरकैदेतून सुटका

By

Published : Oct 13, 2020, 10:11 PM IST

Updated : Oct 13, 2020, 10:35 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख महेबुबा मुफ्ती यांची नजरकैदेतून सुटका केल्याची माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी मंगळवारी दिली.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तींची नजरकैदेतून सुटका

मुफ्ती यांना मागील वर्षी पाच ऑगस्टपासून त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करण्यात आले होते. यानंतर शेकडो लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते. त्यात विविध नेत्यांचाही समावेश होता.

मुफ्ती यांच्या नजर कैदेची मुदत येत्या पाच ऑगस्ट २०२० ला संपत होती. ही मुदत आणखी तीन महिन्यांनी ३१ जुलै २०२० ला आदेश काढून वाढविण्यात आली होती.

गृह खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार मुफ्ती यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान ‘फेअरव्ह्यू बंगलो’ येथे आणखी तीन महिने नजर कैदेत राहावे लागणार होते. त्यांना तुरुंगाऐवजी घरीच नजर कैदेत ठेवण्याची सवलत (subsidiary jail) देण्यात आली होती.

'कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्याचे सुचवले होते. सध्याची परिस्थिती पाहता ही बाब आवश्यक समजण्यात येत आहे,' असे गृह खात्याच्या आदेशात म्हटले होते.

मागील वर्षी पाच ऑगस्टला नजर कैदेत किंवा अटकेत ठेवण्यात आलेल्या बहुतेक मुख्य प्रवाहातील नेत्यांची सुटका झाली आहे. यात फारुक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.

Last Updated : Oct 13, 2020, 10:35 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details