महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : 'बिहार पोलिसांना मुंबई महापालिकेने केले क्वारंटाईन' - bmc latest news

पाटण्याचे सिनियर सुपरिडेंट ऑफ पोलीस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी रविवारी मुंबईत 11 वाजता दाखल झाले. त्या नंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. त्यांना आयपीएस मेसमधील राहण्याची व्यवस्थाही नाकारण्यात आली आहे.

sushant
sushant

By

Published : Aug 3, 2020, 8:19 AM IST

Updated : Aug 3, 2020, 10:59 AM IST

पाटणा - अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात करण्यासाठी पाटणा पोलिसांनी आयपीएस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी मुंबईत पाठविले आहेत. मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले असल्याचा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की पाटण्याचे सिनियर सुपरिडेंट ऑफ पोलीस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी रविवारी मुंबईत 11 वाजता दाखल झाले. त्या नंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले आहे. त्यांना आयपीएस मेसमधील राहण्याची व्यवस्थाही नाकारण्यात आली आहे.

सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्ती हिच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती.

Last Updated : Aug 3, 2020, 10:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details