चंदीगड - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे जगापुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. भारतातही 12 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य आणिबाणी हाताळताना मोठ्या प्रमाणात भारताची तिजोरी रिकामी होत आहे. पंजाब सरकारचा आत्तापर्यंत 2020 या आर्थिक वर्षात 22 हजार कोटींचा महसूली तोटा झाला आहे.
कोरोना पंजाब सरकार आर्थिक संकटात; मंत्र्यांनी देऊ केला 3 महिन्यांचा पगार
कोरोना आणिबाणी हाताळण्यासाठी पंजाब सरकारमधील मंत्र्यांनी 3 महिन्यांचा पगार मुख्यमंत्री साहाय्य निधीला दिला आहे. तसेच स्वेच्छेने पगारातील काही रक्कम मदत देण्यासाठी आवाहन राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यसरकारमधील कर्मचाऱ्यांना केले आहे.

पंजाब राज्यामध्ये आत्तापर्यंत 186 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यातील 27 जण बरे झाले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. भारातमध्ये कोरोनाचे रुग्ण 12 हजार 759 झाले आहेत. यातील 1 हजार 489 जण पूर्णत बरे झाले आहेत. तर 414 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांमधील 10 हजार 477 अॅक्टीव्ह केसेस आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.