नवी दिल्ली -पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची भेट घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओवरून पाकिस्तानी नागरिकांनीच त्यांना ट्रोल केले आहे.
महमूद कुरैशी एका हॉटेलमधील स्वयंपाकी आणि कर्मचाऱ्यांसोबत हस्तांदोलन करत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. रेषेत उभे असलेले कर्मचारी टाळ्या वाजवत असून कुरैशी कर्मचाऱयांशी हात मिळवत पुढे जात आहेत. या भेटीवरून नेटेकऱ्यानी त्यांना ट्रोल केलयं. 'पाकिस्तानच्या कुटनिताचा विजय. चीनमध्ये परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांची स्वयंपाकी आणि कर्मचाऱ्यासोबत उच्चस्तरीय बैठक', असे पाकिस्तानी नागरिक नायला इनायतने म्हटले आहे.