नवी दिल्ली / इस्लामाबाद - पाकिस्तानने सुरुवातीला आमच्या ताब्यात २ वैमानिक आहेत, असा दावा केला होता. मात्र, त्यातील दुसरा वैमानिक कोण, याबाबत काहीच माहिती दिली नाही. पाकिस्तानने भारताचे २ वैमानिक पकडले असल्याचे सांगितले होते. पण, पाकिस्तानचा हा दावा खोटा असून त्यांनी भारताचा एकच वैमानिक पकडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरा वैमानिक हा पाकिस्तानचाच असून स्थानिक जमावाने त्याला भारतीय समजून मारहाण करत ठार केले. मात्र, पाकिस्तान या गोष्टीला मान्य करत नाही.
पाकिस्तानने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला केले ठार
दुसरा वैमानिक हा पाकिस्तानचाच असून स्थानिक जमावाने त्याला भारतीय समजून मारहाण करत ठार केले. मात्र, पाकिस्तान या गोष्टीला मान्य केलेले नाही.
जमावाने भारतीय समजून ठार केलेल्या पाकिस्तानी वैमानिकाचे नाव विंग कमांडर शहजाजुद्दीन असल्याचे सांगितले जात आहे. 'एफ-१६' या विमानाचा वैमानिक अद्याप बेपत्ता आहे. ज्याठिकाणी 'एफ-१६' विमान पडले तेथील स्थानिकांनीच वैमानिकाला मारहाण करत ठार केले, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.
आम्ही भारताचे विमान पाडले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता तेव्हाच आमच्या ताब्यात भारताचे २ वैमानिक आहेत, असेही पाकिस्तानने सांगितले होते. मात्र, यानंतर भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी आमचा एकच वैमानिक बेपत्ता असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पाकिस्तानने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. भारतीय विंग कमांडर अभिनंदन भारताकडे परत आल्यानंतर पाकिस्तानने बोलणे टाळले.