नवी दिल्ली - पाक लष्कराने यावर्षात आत्तापर्यंत तब्बल ३ हजार ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. काश्मीरात दहशतवाद पसरविण्यासाठी सीमेपलीकडून पाकिस्तान मदत करत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
'पाकिस्तानी लष्कराकडून काश्मीरात सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना काश्मीरात घुसण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून मदत करण्यात येत आहे. त्यामुळे पाककडून अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने ३ हजार ८०० वेळा गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हटले.