नवी दिल्ली - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराच्या कलम 36 अंतर्गत आपल्या कर्तव्याचे उल्लंघन केले असून कराराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले असल्याचं न्यायालयाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती भारतीय दूतावासाला देण्यात आली नव्हती. भारताकडून वारंवार अपिल करूनही कुलभूषण जाधव यांना राजकीय मदत देण्यात आली नाही. आरोपीला राजकीय मदत द्यायची नाही, असे व्हिएन्ना करारात कोठेही म्हटलेले नाही. त्यामुळे कुलभूषण यांना राजकीय मदत न दिल्यामुळे पाकिस्ताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे (आयसीजे) अध्यक्ष न्या. अब्दुलकावी युसूफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले.
हेही वाचा -माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना आदरांजली; सोनिया, राहुल, मनमोहन सिंग उपस्थित
काय आहे कुलभूषण जाधव प्रकरण?
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तेव्हापासून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरारष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. १७ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. याचबरोबर त्यांनी जाधव यांना राजकीय मदत देण्याचे आदेशही पाकिस्तानला दिले होते. दिले होते