नवी दिल्ली - पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस सेवा रद्द केल्यानंतर आता बस सेवाही बंद केली आहे. मात्र, या बद्दलची अधिकृत माहिती पाकिस्तानने दिलेली नाही. अमृतसरहून लाहोरला गेलेली बस विना प्रवासीच रिकामी अमृतसरला परतली आहे.
दिल्ली पाठोपाठ अमृतसर बस सेवाही पाकिस्तानने केली बंद
बस सेवा रद्द केल्याचे पाकिस्तानने अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही, असे एका बस डेपो अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने दिल्ली लाहोर बस सेवाही रद्द केली आहे.
बस सेवा रद्द केल्याचे पाकिस्तानने अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही, असे एका बस डेपो अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने दिल्ली-लाहोर बस सेवाही रद्द केली आहे.
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान आगपाखड करत आहे. भारताबरोबरचे राजनैतिक संबध पाकिस्ताने संपुष्टात आणले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. भारताबरोबरचा व्यापार नावापुरताच असताना तोही पाकिस्तानने बंद केला आहे. पाकिस्तानच्या या कृती विरोधात भारताने निषेध नोंदवला आहे.