श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये स्थित असलेले भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशवादी गट जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सैन्याला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशवादी जम्मू काश्मीरवर हल्ल्याच्या तयारीत!; भारतीय सैन्य हायअलर्टवर - भारतीय सैन्य हायअलर्टवर
पाकिस्तान पुरस्कृत दहशवादी गट जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारी सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भारतीय सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानी सैन्याच्या 3 जवानांचा खात्मा केला होता. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. सीमेवर मोठा गोळीबार होत असून याचा फायदा घेत पाकिस्तान काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे.