इस्लामपूर- महत्त्वाकांक्षी अशा करतारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानने, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रित करण्याचे ठरवले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ही माहिती दिली होती. त्यासाठी मनमोहन सिंग यांना रीतसर आमंत्रण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता, मनमोहन सिंग हे आमंत्रण स्वीकारणार नसल्याचे कॉंग्रेस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
शिखांच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे, पाकिस्तानच्या करतारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारा. भारतातील शीख भाविकांना तेथे जाता यावे यासाठी करतारपूर कॉरिडॉर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कॉरिडोअरचे उद्घाटन पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.