महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2019, 8:24 PM IST

ETV Bharat / bharat

कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभ, नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानकडून आमंत्रण

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.

कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभ, नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानकडून आमंत्रण

नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन येत्या ९ नोव्हेंबरला करणार आहे. पाकिस्ताने या उद्घाटन समांरभासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले आहे.


पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी इम्रान खान यांच्या आदेशानंतर सिद्धू यांना फोनवरून उद्घाटन समांरभात सामिल होण्याचे आमंत्रण दिले आहे. यापुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी प्रमुख पाहूणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रन दिल्याचं सांगितले होते. मनमोहन सिंग यांनी आमंत्रण मान्य केले असून ते एक प्रमुख पाहुण्याच्या रुपात नाही. तर एका सामान्य माणूस म्हणून कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समांरभात येतील, असे कुरैशी यांनी सांगितले होते.

हेही वाचा -युरोपियन प्रतिनिधिमंडळ काश्मीर दौऱ्यावर; श्रीनगरमध्ये दाखल


इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू यांनी उपस्थिती लावली होती. तिथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धूवर टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details