नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी जागतिक स्तरातून अनेक नेत्यांचे फोन केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींना फोन करत शुभेच्छा देताना, गरीबी, परराष्ट्र सबंधात सुधारणा आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करत नवी दिल्ली आणि इस्लामाबाद देशांच्या नागरिकांमध्ये सुधारणा करण्यासाठी एकसाथ काम करतील, अशी इच्छा व्यक्त केली.
नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी इम्रान खान यांचा फोन; गरीबी आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार - परराष्ट्र
दोन्ही राष्ट्रांत विश्वासाचे नाते निर्माण करणे, दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करणे आणि शांतता प्रस्थापित करत दोन्ही देशाला वैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करण्याबाबत दोन्ही पंतप्रधानांत चर्चा झाली.
गरीबी, परराष्ट्रसबंध आणि दहशतवादाच्या मुद्यांवर इम्रान खान यांच्याशी बोलताना मोदींनी प्रामुख्याने गरीबी हटवण्यासाठी एकसाथ काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रांत विश्वासाचे नाते निर्माण करणे, दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करणे आणि शांतता प्रस्थापित करत दोन्ही देशाला वैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करण्याबाबत दोन्ही पंतप्रधानांत चर्चा झाली.
दक्षिण आशियाच्या मुद्यावर बोलताना इम्रान खान म्हणाले, दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धी स्थापन करण्यासाठी मोदींबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याआधीही इम्रान खान यांनी ट्वीटरवर मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या. याला मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.