महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरच्या विषयावर एकाकी पडलेले इम्रान हताश, पाकला आंतरराष्ट्रीय पाठिंबा नाहीच - jammu kashmir

काश्मीर मुद्द्यावर एकाकी पडल्याने हताश झालेल्या पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी टि्वट करुन निराशा व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला जम्मू-काश्मीरमध्ये नरसंहार पाहायला मिळेल, असाही इशारा देण्याचा अखेरचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

इम्रान खान

By

Published : Aug 8, 2019, 11:49 PM IST

नवी दिल्ली - भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर आगपाखड सुरु आहे. भारताबरोबर व्यापार, राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंतची आक्रमक भूमिका घेऊनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही. त्यामुळे काश्मीर मुद्द्यावर एकाकी पडल्याने हताश झालेल्या पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी टि्वट करुन निराशा व्यक्त केली आहे.

'काश्मिरी जनतेचा आवाज दडपण्यात आला आहे. संचारबंदी हटवल्यानंतर तेथे काय घडते, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काश्मिरी जनतेविरोधात मोठ्या प्रमाणावर लष्करी बळाचा वापर केल्याने तेथील स्वातंत्र्य चळवळ रोखता येईल, असे भाजप सरकारला वाटते का? उलट, या चळवळीला आणखी चालना मिळेल,' असे इम्रान यांनी टि्वट करून म्हटले आहे.

यानंतर आणखी एक ट्विट करून 'आंतरराष्ट्रीय समुदायाला जम्मू-काश्मीरमध्ये नरसंहार पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय समुदाय हे पाहत राहणार की, हे रोखण्याची नैतिक हिम्मत दाखवणार,' असा सवाल इम्रान यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details