महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बोलावली तत्काळ बैठक

या बैठकीत सुरक्षा विषय मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती पाकिस्तान रेडिओकडून मिळाली आहे.

पाकिस्तान

By

Published : Feb 26, 2019, 11:53 AM IST

इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेवरील बालाकोट तर पाकव्याप्त काश्मिरातील चकोटी आणि मुझफ्फराबाद या भागात हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाच्या '१२ मिराज २०००' लढाऊ विमानांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तत्काळ बैठक बोलावली आहे.

या बैठकीत सुरक्षा विषय मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती पाकिस्तान रेडिओकडून मिळाली आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या अध्यक्षतेखाली सकाळी ७ वाजता कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत हल्ल्याची माहिती घेण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details