भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 'एफ-१६' विमान पाडले - जोश "जय हिंद"
पाकिस्तानच्या हवाई दलाचे 'एफ-१६' विमान भारताने त्यांच्याच हद्दीत पाडले. या विमानाने भारतीय हद्दीत घुसून सीमा भागात बॉम्ब फेकले होते. जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्तानने टाकलेल्या बॉम्बचे काही तुकडे लष्कराच्या तळाजवळ सापडले आहेत. त्याची छायाचित्रेही वृत्तसंस्थांनी प्रदर्शित केली आहेत.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हवाई दलाचे 'एफ-१६' विमान भारताने त्यांच्याच हद्दीत पाडले. या विमानाने भारतीय हद्दीत घुसून सीमा भागात बॉम्ब फेकले होते. पाकिस्तान सीमेच्या आत ३ किलोमीटर अंतरावर पाडल्याची माहिती आहे. पाकचे हे विमान पडताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला होता. तर, आज त्यांचे एक विमान पाडण्यात भारताला यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्तानने टाकलेल्या बॉम्बचे काही तुकडे लष्कराच्या तळाजवळ सापडले आहेत. त्याची छायाचित्रेही वृत्तसंस्थांनी प्रदर्शित केली आहेत.