नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निवळण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून गोळीबार केल्यानंतर भारताकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर
सीमाभागातील अखनूर आणि सुंदरबानी विभागात लाईन ऑफ कंट्रोलजवळ (एलओसी) पाकिस्तानने गोळीबार केला आहे.
भारत पाकिस्तान सीमा
सीमाभागातील अखनूर आणि सुंदरबानी विभागात लाईन ऑफ कंट्रोलजवळ (एलओसी) पाकिस्तानने गोळीबार केला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पाकिस्तानने गोळीबाराला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत हा गोळीबार सुरू होता.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सीमेवर दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू होता. सकाळनंतर गोळीबार थांबला, अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.