श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराने काल (शुक्रवारी) जम्मू काश्मिरातील कठुआ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत रात्रभर गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी आज या वृत्ताला दुजोरा दिला. सीमेवरील कोठा येथील लष्करी चौकीवर आणि इतर भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
काश्मिरात सीमेवर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार; स्थानिकांनी घेतला बंकरचा सहारा - ceasefire violation pak
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. त्यांच्या या आगळीकीला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहाटे सुमारे साडेचार वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता.
रात्री साडेदहाच्या दरम्यान पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या आगळीकीला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहाटे सुमारे साडेचार वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता. जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळाली नाही. मात्र, गोळीबारामुळे सीमेवरील गावांमध्ये भीती पसरली. सतत गोळीबार होत असल्याने स्थानिक नागरिकांना रात्र बंकरमध्येच काढावी लागली.
याआधी 5 जुलैला पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 2020 सालात आत्तापर्यंत 2 हजार 400 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गोळीबारामध्ये अनेक स्थानिक नागरिक मारले गेले असून जवानही शहीद झाले आहेत. तर शेतीचे, घरांचे नुकसानही होते. अनेक जनावरेही गोळीबारात दगावली आहेत.