महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खोटेनाटे पुरावे म्हणून दाखवताना पाकचेच हसे होत आहे - सीतारामन

'या स्ट्राईकमुळे काहीही फरक पडलेला नाही. कोणीही मारले गेलेले नाही, असे पाकिस्तानला दाखवायचे आहे. त्यांनी त्या ठिकाणी पत्रकारांना घेऊन जाण्यासाठी ४० दिवस लावले. तसेच, या लोकांना केवळ या मदरशाकडे जाण्याचीच परवानगी देण्यात आली. त्यांना इतरत्र कुठेही जाऊ देण्यात आले नाही.'

निर्मला सीतारामन

By

Published : Apr 17, 2019, 5:15 PM IST

नवी दिल्ली - 'पाकिस्तानात काही संरक्षण अधिकारी आणि निवडक पत्रकारांना बालाकोटमधील एका मदरशाकडे घेऊन जाण्यात येत आहे. या मदरशाला भारतीय हवाई दलाने केलेल्या स्ट्राईकमध्ये स्पर्शही झाला नव्हता. भारताकडून पाकिस्तानातल्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला करण्यात आला होता. मात्र, काहीतरी खोटेनाटे दाखवून पाकिस्तान स्वतःचाच उपहास करून घेत आहे,' असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.


'या स्ट्राईकमुळे काहीही फरक पडलेला नाही. कोणीही मारले गेलेले नाही, असे पाकिस्तानला दाखवायचे आहे. त्यांनी त्या ठिकाणी पत्रकारांना घेऊन जाण्यासाठी ४० दिवस लावले. तसेच, या लोकांना केवळ या मदरशाकडे जाण्याचीच परवानगी देण्यात आली. त्यांना इतरत्र कुठेही जाऊ देण्यात आले नाही. हा मदरसा डोंगराच्या पायथ्याशी होता. याच्या मागे दाट जंगलात दहशतवादी प्रशिक्षण तळ होते. अनेक पाकिस्तानी वेबसाईटसमधून येथे दहशतावादी बनवण्यासाठी तरुणांची भरती सुरू होती. त्यांना जिहादी बनवले जात होते. त्या वेबसाईटसवर पाहिले तर तेथे किती दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते, ते समजेल. याच दहशतवाद्यांनी भारतात विविध हल्ले घडवले. त्यामुळे काही झालेच नसल्याचे भासवून पाकिस्तान स्वतःचेच हसे करून घेत आहे,' असे सीतारामन म्हणाल्या.


काही काळापूर्वी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणुकांनंतर पुन्हा भारतात भाजप सरकार आल्यास शांततेविषयी चर्चा करणे सोपे होईल. तसेच, काश्मीर प्रश्नही सकारात्मकरीत्या सोडवता येईल, असे म्हटले होते. यावर बोलताना सीतारामन यांनी हा काँग्रेसचाच गनिमी कावा असू शकतो, असे म्हटले आहे. त्यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना काँग्रेसला लक्ष्य केले.

ABOUT THE AUTHOR

...view details